मी राधिका, मी प्रेमिका
मी राधिका, राधिका, मी प्रेमिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी
मी, मी, मी राधिका, राधिका, मी प्रेमिका
♪
अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी
अपरात्री, अपरात्री कुंजवनी, कुंजवनी
अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी
कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना
मीलनासी आतुरले
मी, मी, मी राधिका, राधिका, प्रेमिका
मी राधिका...
♪
श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजे ही मनवीणा
मंत्रमुग्ध मोहरले
मी, मी, मी राधिका, राधिका, मी प्रेमिका
♪
येई भान तृप्तगात्र गोकुळी पहाट मात्र
येई भान तृप्तगात्र गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी? कसे हे सांगू मी?
कुणा हे सांगू मी? कसे हे सांगू मी?
कुमजेना श्याम क्षण जगले
मी, मी, मी राधिका, राधिका, मी राधिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी
मी, मी राधिका, राधिका, प्रेमिका
मी राधिका...
Поcмотреть все песни артиста