तू माझ्या मागे होतास ना रे, बाबा? माझ्या सगळ्या असण्या-नसण्यात तुच होतास ना? माझ्या मधले मी, तुझ्या मधले मी तुच आहेस, तू होतास, सांग ना, बाबा? ♪ तुच जगतो ना मी ही जगताना तुच असतो ना मी ही नसताना तुच तो निचरा माझा असण्याचा तू असा माझ्यात रे, मी जसी पाण्यात रे तू माझ्या मागे होतास ना रे, बाबा? तू आहेस, तू होतास, सांग ना, बाबा? ♪ येऊ दे ना घरी पुन्हा, तुझ्या-माझ्या घरी तू समजून घे मला, बाबा, मी ही चुकले जरी धडपडले कधीही अडले गडबडले जरी मी पडले तू माझ्या मागे होतास ना रे, बाबा? तू आहेस, तू होतास, सांग ना, बाबा?