Kishore Kumar Hits

Bhimrao Panchale - Andaaz Aarshacha Wate Khara şarkı sözleri

Sanatçı: Bhimrao Panchale

albüm: Ek Zakham Sugandhi


गीत गुंजारते जीवनाचे गझल
गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल
भावनेला मुक्या बोलवेना जिथे नेमकी वेदना तिच वाचे गझल
रसिक मित्रहो, आदाब
भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे
आणि अभिव्यक्तीच एक सशक्त माध्यम आहे गझल
गझल म्हणजे एक तत्त्वज्ञान, एक जीवनशैली
गझलचा दोन ओळींचा शेर म्हणजे
जीवनाची एक-एक चव, एक-एक प्रत्येय
अशी ही गझल आपल्या खास शैलीत
स्वरांच्या माध्यमातून रसिकां पर्यंत पोहोचवण्याच श्रेय आहे
गझलनावाब Bhimrao Panchale यांना
भीमरावंच्या गायनात भावनेचा ओलावा घेऊन स्वर शब्दांना भेटतात
शब्दातील आशय बोलका होतो
रसिकांशी संवाद साधला जातो
आणि त्यातूनच साकारते एक जखम सुगंधी
वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?
पुस्तकांतून पाहिलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरश्यावरती आता
आरश्याला भावलेली माणसे गेली कुठे?
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
काठावरी उतरली, उतरली
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यांत वेदनेचा, डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला?
जखमा कशा सुगंधी, जखमा
जखमा, जखमा, जखमा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला?
केलेत वार ज्याने, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
माथ्यावरी नभाचे, माथ्यावरी
माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या, कशाच्या
दाही दिशा कशाच्या, हा पिंजरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
अंदाज, अंदाज, अंदाज

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar