सूर्य देहास जळतो आहे मात्र मी शांत चालतो आहे ऐकवू काय गझल मी रसिका सारखा कंठ दाटतो आहे हजार दुःखे मनास माझ्या हजार दुःखे मनास माझ्या हजार जखमा उरात माझ्या वसंत असता सभोवताली वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या हजार जखमा उरात माझ्या तुझ्याविना ही जगावयाचे जरी इथे शेकडो बहाणे तुझ्याविना ही तुझ्याविना ही जगावयाचे जरी इथे शेकडो बहाणे असे खरा रंग जीवनाचा असे खरा रंग जीवनाचा तुझ्यामुळे जीवनात माझ्या हजार जखमा उरात माझ्या समोर मृत्यू उभा तरीही नसे तुझे वेड सोडिले मी समोर मृत्यू उभा समोर मृत्यू उभा तरीही नसे तुझे वेड सोडिले मी तुझीच गाणी अजून असती तुझीच गाणी अजून असती थरारणाऱ्या स्वरात माझ्या हजार जखमा उरात माझ्या गरीब मी दान तारकांचे कुठून ह्या काजळीस देऊ? गरीब मी, गरीब मी गरीब मी दान तारकांचे कुठून ह्या काजळीस देऊ? उगीच खावर उभी असे ही उगीच खावर उभी असे ही निशा अशी अंगणात माझ्या हजार दुःखे मनास माझ्या हजार जखमा उरात माझ्या वसंत असता सभोवताली वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या हजार दुःखे मनास माझ्या