सोडले कालच्या किनाऱ्याला, वादळे घेतली निवाऱ्याला घेतले मी नवे पुन्हा फासे, हारण्याची नशा जुगाऱ्याला ♪ हारण्यास एक नवा डाव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे साकळे जुना, साकळे जुना, नवीन घाव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे ♪ फत्तरास ही फुटू शकेल पालवी फत्तरास ही फुटू शकेल पालवी आसवात तेव्हढा, आसवात तेव्हढा प्रभाव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे ♪ अंधःकार संपणार आज ना उद्या अंधःकार संपणार आज ना उद्या, आज ना उद्या फक्त एक ज्योतीचा, फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे ♪ दुःख हेच एकमेव सत्य जीवनी दुःख हेच एकमेव सत्य जीवनी, सत्य जीवनी दुःख हेच एकमेव सत्य जीवनी त्यातही हसायचा, त्यातही हसायचा सराव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे साकळे जुना, साकळे जुना, नवीन घाव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे