Kishore Kumar Hits

Ashok Patki - Mala Baiko şarkı sözleri

Sanatçı: Ashok Patki

albüm: Evergreen Asha Bhosle Marathi Film Songs Vol 1


मला बायको मिळाली ही कसली रं?
माझ्या डोईवर चढून बसली
मला बायको मिळाली ही कसली रं?
माझ्या डोईवर चढून बसली
मला नवरा मिळाला ह्यो कसला गं?
जसा गुळाला मुंगळा डसला
मला नवरा मिळाला ह्यो कसला गं?
जसा गुळाला मुंगळा डसला

किती डाफरून बोलताय आता
तेव्हा गोंडा का घोळत व्हता?
(गोंडा आणि मी चल फूट-फूट)
कशा थापा मारून मला टाकलं भारून
कशा थापा मारून मला टाकलं भारून
तुम्हां देऊन बा माझा फसला
तुम्हां देऊन बा माझा फसला
मला नवरा मिळाला ह्यो कसला गं?
जसा गुळाला मुंगळा डसला
मला नवरा मिळाला ह्यो कसला गं?
जसा गुळाला मुंगळा डसला

माझ्या सपनाची गं राणी
होती हेमा मालिनीवानी
नाही दैवाची साथ तुझ्या असल्या रूपात
नाही दैवाची साथ तुझ्या असल्या रूपात
जणू हिडिंबा घरात घुसली
आ, जणू हिडिंबा घरात घुसली
मला बायको मिळाली ही कसली रं?
माझ्या डोईवर चढून बसली
मला बायको मिळाली ही कसली रं?
माझ्या डोईवर चढून बसली

तुम्ही धरमेंदर हायसा काय?
भाव हिरोचा का खाताय?
ऐट दावू नगा जरा आईण्यात बघा
ऐट दावू नगा जरा आईण्यात बघा
तुमच्या मुखड्यात म्हसोबा ठसला
आ, तुमच्या मुखड्यात म्हसोबा ठसला
मला नवरा मिळाला ह्यो कसला गं?
जसा गुळाला मुंगळा डसला
मला नवरा मिळाला ह्यो कसला गं?
जसा गुळाला मुंगळा डसला

अगं, बास, बास, बास
बास झाला ह्यो रिकामा वाद
लई वंगाळ भांडायचा नाद
तुमच्यासाठीच मी, माझ्यासाठी तुम्ही
परमेस्वरानं जोड अशी नेमली
पोपट-मैनेची पिरती जमली
कशी गालात खुदकन हसली रं
मला बायको मिळाली ही असली
मला नवरा मिळाला ह्यो असला गं
माझ्या काळजाच्या पालखीत बसला
कशी गालात खुदकन हसली रं
मला बायको मिळाली ही असली

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar