रुपेरी वालू, सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय
गोव्याचे किना-याव नाखवा व्हरीन नेशील का?
निले सागरी दुनियेची सफर देशील का?
नको बघु अस मनी होत कस
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरच्या जाल्यामंदी
कालीज गुतल आज
गोव्याचे किना-याव नाखवा व्हरीन नेशील का?
गोव्याचे किना-याव नाखवा बेगीन नेशील ना
इच्छा तुझे मनी, येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का?
त्या गोव्याचे बाजारानु
हात हाती देशील का?
एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान
एक हाैस माझी पुरवाल का?
माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का?
रुपेरी वालू सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेशील कोने गावी नेशील
सांग तुझे मनान काय चाल्लय
कोने देशी नेऊ कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय
रुपेरी वालू सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय
गोव्याचे किना-याव नाखवा व्हरीन नेशील का?
निले सागरी दुनियेची सफर देशील का?
नको बघु अस मनी होत कस
माझे कालजान भरली रं लाज
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri