Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Ved Lagla şarkı sözleri

Sanatçı: Sandeep Khare

albüm: Ayushyawar Bolu Kahi


दिसलीस वाऱ्यामधे (वाऱ्यामधे, वाऱ्यामधे)
आपुल्याच तोऱ्यामधे (तोऱ्यामधे, तोऱ्यामधे)
दिसलीस वाऱ्यामधे (वाऱ्यामधे, वाऱ्यामधे)
आपुल्याच तोऱ्यामधे (तोऱ्यामधे, तोऱ्यामधे)
दिसलीस वाऱ्यामधे, आपुल्याच तोऱ्यामधे
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमधे, वेड लागलं
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमधे, वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
रणरण माळावर घालतो मी पिंगा
काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रणरण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज रात्री दारातून कवितांचे सडे माझ्या, वेड लागलं
रोज रात्री दारातून कवितांचे सडे माझ्या, वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
वेड लागलं आता, वेड लागलं आता, वेड लागलं

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ, कोण धरा, झाडा नाही भान
हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ, कोण धरा, झाडा नाही भान
जशी काही पांखराला दिसे दूर वीज
जशी काही पांखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे ये न माझ्या घरट्यात नीज, आता वेड लागलं
तिला म्हणे ये न माझ्या घरट्यात नीज, आता वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी, बोलतो मी, चालतो मी असा
पाहतो मी, बोलतो मी, चालतो मी असा
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा, आता वेड लागलं
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा, आता वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
आता, वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं

खुळावले घर-दार, खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
खुळावले घर-दार, खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली आग अशी झणाणली काया
उसळली आग अशी झणाणली काया
जीव असा खुळा, त्याला विषाचीच माया, आता वेड लागलं
जीव असा खुळा, त्याला विषाचीच माया, आता वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
आता, वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं

मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी, सारी उफराटी तऱ्हा
नका लागू नादी, सारी उफराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चीरा हा, वेड लागलं
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चीरा, आता वेड लागलं
वेड लागलं, हा, वेड लागलं
वेड लागलं, आता वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं, वेड लागलं
वेड लागलं मला, वेड लागलं, वेड लागलं
वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं
वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar