Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Re Phulanchi şarkı sözleri

Sanatçı: Sandeep Khare

albüm: Kadhi He Kadhi Te


रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी
गंध मातीचा कुपितून भरू नये कोणी
गंध मातीचा कुपितून भरू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी

वाट शोधावी, पहावी, वाट भोगावी
वाट शोधावी, पहावी, वाट भोगावी
गाव आहे दूर म्हणुनी अडू नये कोणी
गाव आहे दूर म्हणुनी अडू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी

लाख दुःखे पचवुनी येतात जे डोळा
लाख दुःखे पचवुनी येतात जे डोळा
दोन त्या थेंबांस "शुल्लक" म्हणू नये कोणी
दोन त्या थेंबांस "शुल्लक" म्हणू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी

"आस्तिकाला देव नाही," म्हणू नये कोणी
"आस्तिकाला देव नाही," म्हणू नये कोणी
एवढे ही ठार नास्तिक असू नये कोणी
एवढे ही ठार नास्तिक असू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी

सात फुटक्या घागरीतून जन्म हा गळता
सात फुटक्या घागरीतून जन्म हा गळता
थेंब त्यातील एक ही दवडू नये कोणी
थेंब त्यातील एक ही दवडू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी

सर्व मी सोडून जाता प्रार्थना इतुकी
सर्व मी सोडून जाता प्रार्थना इतुकी
कोपऱ्यावर ओळखीचे दिसू नये कोणी
कोपऱ्यावर ओळखीचे दिसू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी
गंध मातीचा कुपितून भरू नये कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar