हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून बोलल्या सारखे बोलायचे एवढे सोडून, तेवढे सोडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, हो, खांदे पाडून ♪ रस्त्यावर उडवतो कोण तरी, कुणा तरी लाख माशी घोंघावते विझलेल्या दीपावरी पुन्हा तेच जाळायचे एक नवे झाड तोडून पुन्हा तेच जाळायचे एक नवे झाड तोडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून ♪ गळ्यातून घुसमटतो कफ माझ्या म्हाताऱ्याच्या एक नवा जीव रडे घरातून शेजाऱ्याच्या दोन्ही वेळ पाहायचे डोळे फाडून, डोळे फाडून दोन्ही वेळ पाहायचे डोळे फाडून, डोळे फाडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून ♪ फक्त दोन शुष्क हात आणि भाळावर घाम जगण्याचे रामायण आणि हरवला राम उरातल्या वनवासी फिरे आशा लाज सोडून उरातल्या वनवासी फिरे आशा लाज सोडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून ♪ तूच दिले पावसाळे, उन्हाळे ही दिले तूच उत्तरे ही तुझं ठावी, प्रश्न मांडणारा तूच आम्ही काय करायचे? फक्त उभे हात जोडून आम्ही काय करायचे? फक्त उभे हात जोडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून बोलल्या सारखे बोलायचे एवढे सोडून, तेवढे सोडून हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून, खांदे पाडून