Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Ek Zad şarkı sözleri

Sanatçı: Sandeep Khare

albüm: Kadhi He Kadhi Te


एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता-मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय...
चुकल काय... चुकल काय
मुळात चुकल काय... पाह्यला झुकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला
रडता येत नाही...
येत नाही.येत नाही...
रडता येत नाही... म्हणून चिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मान... खूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल
वेड्या सारख
वेड्या सारख... वेड्या सारख
शून्यात बघत हसलेल
एक मी सार सार बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
माझ्यात सारे... माझ्यात सारे
माझ्यात सारे... माझ्यात सारे
माझ्यात सारे... साऱ्यात माझे पाहणारा
एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar