Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Don Haat şarkı sözleri

Sanatçı: Sandeep Khare

albüm: Kadhi He Kadhi Te


अरे! अरे! अरे! अरे! मुलानो
अरे! खूप झाला खेळ
अरे! आता थोडे शिकायच
मोठे व्हायच, माणूस व्हायच
अरे! आम्ही तुमचे खापर पणजोबा, पणजोबा, आजोबा
माणूस म्हणून जन्मलो
माणूस म्हणून फिरलो
आणि माणूस म्हणूनच वारलो
कसे जगलो ऐकायचाय, माणूस व्हायचय
दोन हात, दोन पाय
दोन हात, दोन पाय
दोन डोळे कान
छोट्या-छोट्या धडावर सावरतो मान
वार्यासवे फिरणार्या पाठीवर पोक
सार्या जगाहून मोठे मानेवर डोके
भांडनार जगाशी भांडनार
माणूस आम्ही ही होणार
(दोन हात, दोन पाय)
(दोन डोळे कान)
(छोट्या-छोट्या धडावर सावरतो मान)
(वार्यासवे फिरणार्या पाठीवर पोके)
(सार्या जगाहून मोठे मानेवर डोके)
भांडनार जगाशी भांडनार
माणूस आम्ही ही होणार
(भांडनार जगाशी भांडनार)
(माणूस आम्ही ही होणार)
क्षणभर सुखासाठी
जन्मभर मांडणार नाच
धरणीला आकाशाची
आता देऊ बघणार लाच
(क्षणभर सुखासाठी)
(जन्मभर मांडणार नाच)
(धरणीला आकाशाची)
(आता देऊ बघणार लाच)
इसापाच्या बेडकिला मारूनिया टांग
पोटभर झाले तरी लावणार रांग
(हे, इसापाच्या बेडकिला मारूनिया टांग)
(पोटभर झाले तरी लावणार रांग)
मागणार सारखी मागणार
मागणार सारखी मागणार
माणूस आम्ही ही होणार
(भांडनार जगाशी भांडनार)
(माणूस आम्ही ही होणार)

एक आला, एक गेला
एक नुसता लोंबकळतो
एक कुणी एकासाठी
जन्मभर मौन पाळतो
(एक आला, एक गेला)
(एक नुसता लोंबकळतो)
(एक कुणी एकासाठी)
(जन्मभर मौन पाळतो)
एक कुणी देत कुणा एकासाठी साद
एक घळी स्वत: सह दुसर्याशी वाद
(एक कुणी देत कुणा एकासाठी साद)
एक घळी स्वत: सह दुसर्याशी वाद
पिळनार सारखी पिळनार
पिळनार सारखी पिळनार
माणूस आम्ही ही होणार

जन्मा आलो जगणार वेळ झाली मरणार
पोट आहे भरणार पोटापाठी पळणार
दुसर्याला छळनार, स्वत: लाही छळनार
कधी नाही कळणार, कळूनिया वळणार
कधीतरी कुठेतरी वळणाच्या पाशी
पोट येथे ठेऊनीया जायचे उपाशी
(कधीतरी कुठेतरी वळणाच्या पाशी)
(पोट येथे ठेऊनीया जायचे उपाशी)
पिसणार हा जन्म पिसणार
पिसणार हा जन्म पिसणार
(माणूस आम्ही ही होणार)
(दोन हात, दोन पाय)
(दोन डोळे कान)
छोट्या-छोट्या धडावर सावरतो मान
(वार्यासवे फिरणार्या पाठीवर पोके)
(सार्या जगाहून मोठे मानेवर डोके)
भांडनार जगाशी भांडनार
माणूस आम्ही ही होणार
माणूस आम्ही ही होणार
आता माणूस आम्ही ही होणार

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar