दाटला काळोख होता चहुदिशांना निरवाचा शाप होता वेदनांना ♪ दाटला काळोख होता चहुदिशांना निरवाचा शाप होता वेदनांना त्याच काळोखातुनी पण सूर वाहे विंधलेल्या काळजाचे गीत झाले विंधलेल्या काळजाचे गीत झाले ♪ आसवे माझीच माझ्या मालकीची आन त्यांना मूक सारे सोसण्याची आसवे माझीच माझ्या मालकीची आन त्यांना मूक सारे सोसण्याची गाठुनी एकांत त्यांना फितूर केले विंधलेल्या काळजाचे गीत झाले विंधलेल्या काळजाचे गीत झाले दाटला काळोख होता चहुदिशांना ♪ लपवलेला एक वनवा अंतरात अन निख्याऱ्यांचीच होते पायवाट लपवलेला एक वनवा अंतरात अन निख्याऱ्यांचीच होते पायवाट नकळता पण अग्नीला त्या फुल आले विंधलेल्या काळजाचे गीत झाले विंधलेल्या काळजाचे गीत झाले विंधलेल्या काळजाचे गीत झाले