Shridhar Phadke - Chaandanyaat Jhoolto Bai şarkı sözleri
Sanatçı:
Shridhar Phadke
albüm: Fite Andharache Jake
चांदण्यात झुलतो बाई, गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजीरा
चांदण्यात झुलतो बाई, गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजीरा
चांदण्यात झुलतो बाई...
♪
पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी
पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी
पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी
पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी
निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा
चांदण्यात झुलतो बाई, गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजीरा
चांदण्यात झुलतो बाई...
♪
मोहरल्या वाटा आता मंतरली राने
हुरहुरल्या शपथा येथे झुरमुरली पाने
मोहरल्या वाटा आता मंतरली राने
हुरहुरल्या शपथा येथे झुरमुरली पाने
अधरांचा, स्पर्शांचा, भास बावरा
हो, चांदण्यात झुलतो बाई, गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजीरा
चांदण्यात झुलतो बाई...
♪
तळहातावर भिजली मेहंदी स्वप्न होऊनी
ओठांवरती रुजले गाणे जन्म होऊनी, जन्म होऊनी
ध्यासांचा, हो, भासांचा...
ध्यासांचा, भासांचा गोड भोवरा
चांदण्यात झुलतो बाई, गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजीरा
चांदण्यात झुलतो बाई, गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजीरा
चांदण्यात झुलतो बाई...
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri