Kishore Kumar Hits

Shridhar Phadke - O Letya Paanaat şarkı sözleri

Sanatçı: Shridhar Phadke

albüm: Fite Andharache Jake


ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
(ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले)
(डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले)
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची
(साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची)

डोहाळे या मातीला सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नवीन...
थरारे मन, वारे नवीन, सृजन रंग न्हाले
(ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले)
(डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले)
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका जाहली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी...
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले?
(ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले)
(डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले)
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

थरपून दाही दिशा ओढाळ झाल्या कशा
थरपून दाही दिशा ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू...
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा...
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले
(ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले)
(डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले)
ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar