Kishore Kumar Hits

Shridhar Phadke - Kalika Kashya Ga Bai şarkı sözleri

Sanatçı: Shridhar Phadke

albüm: He Gagana (Bhav Geet)


कालिका कश्या गं बाई भूलल्या?
इवल्या फुलात बाई फुलल्या
(कालिका कश्या गं बाई भूलल्या?)
(इवल्या फुलात बाई फुलल्या)
सजून-धजून बाई भरात कलली जाई
(लाजून-बुजून बाई उरात फुलली जुई)
फुलली जाई, फुलली जुई
(जाई-जुई, जाई-जुई)
फुलल्या, कश्या गं बाई फुलल्या?
इवल्या फुलात बाई फुलल्या

अवखळ वाऱ्यात
अवखळ वाऱ्यात काळोख बाकी
थरथर पानात भरून राही
(सलज्ज कोवळ्या)
(सलज्ज कोवळ्या जाई-जुईच्या)
मनात चांदणे चोरून पाहे
भवती काजळी राई, धवल ठसली जाई
(तमाळ रंगात काही विभोर हसली जाई)
झुलली जाई, झुलली जुई
(जाई-जुई, जाई-जुई)
झुलल्या, कश्या गं बाई झुलल्या?
इवल्या फुलात बाई फुलल्या

मुग्ध हरपल्या कुपीत, चित्त-चोर गंध कोंदला
लुब्ध उकलता गुपित, ओसंडून मुक्त नांदला
(नितळ निवांत पाही नाजूक-साजूक जाई)
हो, झाकून तळावी राही, मिटून लोचनं जुई
डोलली जाई, डुलली जुई
(जाई-जुई, जाई-जुई)
डूलल्या, कश्या गं बाई डूलल्या?
(इवल्या फुलात बाई फुलल्या)

रात्र संपली, निळी उषा सुरम्य रंग रंगली
माळ गुंफली, पहाट पाकळ्या कळ्यात दंगली
(ढळल दिशात दाही नाचली मोहक जाई)
वळल्या नभात वाही सुगंध साजिरी जुई
कळली जाई, कळली जुई
(जाई-जुई, जाई-जुई)
कळल्या, कश्या गं बाई कळल्या?
(झुलल्या, कश्या गं बाई झुलल्या?)
कालिका कश्या गं बाई भूलल्या?
(फुलल्या, कश्या गं बाई फुलल्या?)

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar