Kishore Kumar Hits

Shridhar Phadke - Vara Labad Aahe şarkı sözleri

Sanatçı: Shridhar Phadke

albüm: Aboliche Bol


लपत-छपत, बिचकत-गवत, झननन करत, अन गुणगुणत
वारा, वारा, वारा निघे लपाया
झाडात आड आहे, झाडात आड आहे
गिल्ला करुन पाने सांगून राहिली की
गिल्ला करुन पाने सांगून राहिली की
वारा, वारा, वारा
वारा लबाड आहे, झाडात आड आहे
वारा लबाड आहे, झाडात आड आहे वारा

झाडात मोहराचे सारे घबाड आहे
झाडात मोहराचे सारे घबाड आहे
वाकून एक फ़ांदी सांगून राहिली की
घन घननसा, मद मदनसा, मृदु मदिरसा, मधु मधुरसा
भुंगा, भुंगा, भुंगा
भुंगा उनाड आहे, झाडात आड आहे
भुंगा उनाड आहे, वारा लबाड आहे, वारा

वाड्यास भोवताली राई उफाड आहे
वाड्यास भोवताली राई उफाड आहे
पडवीवरील कौले सांगून राहिली की
सळसळ सरी, जळकत बरी, उजळत भरी, गडबड करी
छपरी, छपरी, छपरी
छपरी उजाड आहे, वारा लबाड आहे
छपरी उजाड आहे, वारा लबाड आहे, वारा

चोरून दे मुका तू (इश्श)
चोरून दे मुका तू, वस्ती चहाड आहे
चोरून दे मुका, वस्ती चहाड आहे
वाऱ्यास साखळी ही सांगून राहिली की
छुनछुन छुनक, रुणझुण उडे, छमछम छमक, मन गडबडे
उघडे, उघडे, उघडे
उघडे कवाड आहे, वारा लबाड आहे
वारा लबाड आहे, hmm...
भुंगा उनाड आहे, hmm...
बस्ती चहाड आहे, hmm...
उघडे कवाड आहे, hmm...
वारा लबाड आहे, hmm...
वारा

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar