Kishore Kumar Hits

Prabhakar Jog - Raundi Me Roj Yebuni şarkı sözleri

Sanatçı: Prabhakar Jog

albüm: Anuradha Padawal Marathi Film & Modern Songs


सर्व दारे बंद झाली
सर्व आशा संपली
म्हणून आले दारी तुझिया
आयपसगत जाहली
राऊळी मी रोज येऊन
नाही तुजला जाणिले
दुःख हे सलते जिवाला
देव-दगडा मानिले, देव-दगडा मानिले

भक्तीच्या मी कल्पतरुचे रूप दारी लाविले
वाढवी का दिवस-रात्री, देहभाना विसरले
त्या तरुला फळ विषारी, अवकृपेचे दागले
दुःख हे सलते जिवाला
देव-दगडा मानिले, देव-दगडा मानिले
राऊळी मी रोज येऊन

द्रौपदी, सीता, सतींच्या रक्षणाला धावला
पाठीराखा, पाठमोरा तूच, मज तू जाहला
भक्त संकटी तारण्याचे ब्रीद का तू मोडिले?
दुःख हे सलते जिवाला
देव-दगडा मानिले, देव-दगडा मानिले
राऊळी मी रोज येऊन

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar