Kishore Kumar Hits

Prabhakar Jog - Aaj Bai Lajle Mee şarkı sözleri

Sanatçı: Prabhakar Jog

albüm: Anuradha Padawal Marathi Film & Modern Songs


आज बाई लाजते मी, नाचते ही भावना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना
या वनी, या अंगणी आनंद ओला पाहुना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना

या कळीचे, पाकळीचे रंग ल्याले आज मी
गंध हा धुंदीत न्हाला, गंग झाले आज मी
या कळीचे, पाकळीचे रंग ल्याले आज मी
गंध हा धुंदीत न्हाला, गंग झाले आज मी
थेंब हे, दवबिंदू हे, मोत्यापरी ही कल्पना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना

संथ पाणी, गोड गाणी सूर माझ्या लावीती
पाऊले चाहूल घेता वाट माझी दाविती
संथ पाणी, गोड गाणी सूर माझ्या लावीती
पाऊले चाहूल घेता वाट माझी दाविती
स्वप्न हे जागीपणी आभास वाटे देखना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना

रुंजतो हा, गुंजतो हा आज भुंगा सावळा
रुंजतो हा, गुंजतो हा आज भुंगा सावळा
लोचने आतुर झाली, छंद लागे आगळा
बोलते कानी कुणी येईल वाटा साधना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना
या वनी, या अंगणी आनंद ओला पाहुना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना
आज बाई लाजते मी, नाचते ही भावना

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar