आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता (निद्रा करा अवधूता) चिन्मय सुखधामी जाऊन पहुडावे आता ♪ वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडीला गुरू हा चौक झाडीला तंयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ♪ पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती (सुंदर नवविधाभक्ती) ज्ञानाच्या समया उजळून लाविल्या ज्योती भावार्थाचा मंचक हृदयापाशी टांगीला हृदयापाशी टांगीला मनाची सुमने करुनी केले शेजेला ♪ द्वैताचे प्रपात लोटून एकत्र केले द्वैताचे प्रपात लोटून एकत्र केले (गुरूने एकत्र केले) दुर्बुद्धीच्या गाठी सोडुन पडदे सोडीले आशा-तृष्णा कल्पनेचा सांडुनी गलबला गुरू हा सांडूनी गलबला दया, क्षमा, शांती दासी उभ्या सेजेला अलक्ष्य उन्मनी घेऊनी नाजूकसा गेला गुरू हा नाजूकसा गेला निरंजनी सद् गुरू माझा निजे शेजेला निरंजनी सद् गुरू माझा निजे शेजेला