Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Na Manjur şarkı sözleri

Sanatçı: Salil Kulkarni

albüm: Na Manjur


नामंजुर, नामंजुर, नामंजुर
(नामंजुर, नामंजुर, नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर, नामंजुर
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
मी ठरवावी, ठरवावी, ठरवावी, ठरवावी
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येइल त्या लाटेवर डुलणे नामंजुर (नामंजुर)
येइल त्या लाटेवर डुलणे नामंजुर (नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
(मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको)
(मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको)
मुहुर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा
मुहुर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजुर
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजुर (नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर

माझ्या हाती विनाश माझा, कारण मी
मोहासाठी देह ठेवतो तारण मी
(माझ्या हाती विनाश माझा, कारण मी)
(मोहासाठी देह ठेवतो तारण मी)
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रुचे थिटे पहाणे नामंजुर (नामंजुर)
मज अब्रुचे थिटे पहाणे नामंजुर (नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर

रुसवे, फुगवे, भांडण-तंटे लाख कळा
आपला-तुपला हिशोब आहे हा सगळा
(रुसवे, फुगवे, भांडण-तंटे लाख कळा)
(आपला-तुपला हिशोब आहे हा सगळा)
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गाऱ्हाणे नामंजुर, नामंजुर
गगनाशी नेणे गाऱ्हाणे नामंजुर (नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर
मी मनस्वितेला शाप मानले नाही
मी मनस्वितेला शाप मानले नाही
अन् उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातुन एकही फिरला नाही
ढग काळा ज्यातुन एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही
निती, तत्त्वे, फसवी गणिते दूर बरी
रक्तातील आदिम जीण्याची ओढ खरी
निती, तत्त्वे, फसवी गणिते दूर बरी
रक्तातील आदिम जीण्याची ओढ खरी
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे
पण रक्ताचा गर्व वहाणे नामंजुर (नामंजुर, नामंजुर)
पण रक्ताचा गर्व वहाणे नामंजुर (हे, नामंजुर, नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येइल त्या लाटेवर डुलणे नामंजुर
येइल त्या लाटेवर डुलणे नामंजुर (नामंजुर)
जपत किनारा शिड सोडणे नामंजुर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजुर (नामंजुर)
नामंजुर (नामंजुर, नामंजुर, नामंजुर)
नामंजुर (नामंजुर, नामंजुर, नामंजुर)
नामंजुर (नामंजुर, नामंजुर)
नामंजुर
नामंजुर

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar