Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Deva Mala şarkı sözleri

Sanatçı: Salil Kulkarni

albüm: Na Manjur


देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच...
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर

कधीतरी, कुठेतरी बसावी धडक
कधीतरी, कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी, तिला कळावे तडक
कळ मला यावी, तिला कळावे तडक
घायाळाला मिळो...
घायाळाला मिळो एक घायाळ नजर, हाए
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर

(ए, देवा मला)

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम, मला वाटावे बरे
तिला येता प्रेम, मला वाटावे बरे
दवा-दारूमध्ये...
अरे, दवा-दारूमध्ये कुठे असतो असर, हा
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला?"
विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला?"
जरा डावीकडे
हो, जरा डावीकडे, जरा पोटाच्या या वर
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर

(ए, देवा मला)

टेकवता छातीवर डोके एकवार
टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय
अरे, व्यथांचाच काय, पडे जगाचा विसर
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच...
हो, आणि तिच्या हातांनीच जखमा या भर
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar