मी पप्पाचा ढापून phone
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello, बोलतंय कोण?
ए, hello
♪
आमचे नाव "खेलाशेठ," डोंगरा एवढे आमचे पेठ
आमचे नाव "खेलाशेठ," डोंगरा एवढे आमचे पेठ
विकत बसतो साजूक तूप, साला चापून खातो आम्हीच खूप
विकत बसतो साजूक तूप, साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण? काय तुमचे नाव?
बोला झटपट कुठलं गाव?
कसले नाव नी कसला गाव
Wrong number लागला राव
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello, बोलतंय कोण?
Hello
♪
लक्षुमबाई मी जोशाघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
लक्षुमबाई मी जोशाघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध अन साय, घरात आत्ता कोनी नाय
अहो, वरती कपभर दूध अन साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोण? काय तुमचे नाव?
बोला झटपट कुठलं गाव?
कसले नाव नी कसला गाव
Wrong number लागला राव
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello, बोलतंय कोण?
Hello, hello, hello
♪
मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
तुम्ही कोण? काय तुमचे नाव?
बोला झटपट कुठलं गाव?
कसले नाव नी कसला गाव
Wrong number लागला राव
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
मी पप्पाचा ढापून phone, phone केले १०२
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello-hello, बोलतंय कोण?
Hello, बोलतंय कोण?
Hello
ढगामधून बोलतोय बाप्पा
चल, चल मारू थोड्या गप्पा
ढगामधून बोलतोय बाप्पा
चल, चल मारू थोड्या गप्पा
बाप्पा बोलतोयस तर मग जरा थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
बाप्पा बोलतोयस तर मग जरा थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच सांगत होता पप्पा, तिकडे आलेत आमचे आप्पा
कालच सांगत होता पप्पा, तिकडे आलेत आमचे आप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर phone जोडून दे
एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर phone जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर्रर, एकटेच गेले केवढे दूर
म्हणले होते जाऊ भूर्रर, एकटेच गेले केवढे दूर
Detail सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे आप्पा
Detail सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे आप्पा
बाप्पा, बाप्पा बोला राव
सांगतो माझं नाव न गाव
कसले नाव नी कसला गाव
Wrong number लागला राव
Поcмотреть все песни артиста