मला न ठाव काय मनात डाव अस उगाच हसून पाह्यचं झुरून झुरून तरी दुरून दुरून असं खुशाल निघून जायचं बरं नव्हं काय खर नव्हं असा गोंडा घोळून मागं मागं फिरून माझी करशील बदनामी कारट्या तुझ्या मनात चोर माझ्या घरासमोर कसा सतरांदा घालतोस घिरट्या बरं नव्हं काय खर नव्हं पाय ओढाळ ग मन खट्याळ ग कसं पळत ते पळतच ना राणी नाही चेहर्यावरी गोष्ट आहे खरी पण कळत ते कळतच ना राणी असं आतून उधाण आणि वरुन विराण आणि मी नाही त्यातली म्हणायचं नाही समजत मला घाई कसली तुला जरा जनाची करावी काळजी झाड वाढायला फळ लागायला जरा टाइम तर द्यावा ना रावजी भलत्या मस्तीमध्ये येता रंगामध्ये वय लक्षात घ्या ना कळीच माझं ऐकून घे थोडं समजून घे काय मनामध्ये भलतं-सलतं नाही लागत डोळा जीव झालाय खुळा माझ्या उरात काही तरी हलत मला समजत नाय अडे माझाही पाय तुला बघून सुटताया भान आड येतो पुन्हा माझा बाईपणा माझ्या शब्दांना लाजेची आन मनी रुसवा धरून गैरसमजा मधून अस भलत्याने भलतंच व्हायचं