जा, जा, जा दिले-दिले मन तुला
जा, जा, जा दिले-दिले मन तुला
कर त्याचे तू काहीही-काहीही
दिले दान, दिले दान
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
जा, जा, जा दिले-दिले मन तुला
कर त्याचे तू काहीही-काहीही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
♪
फुल मनाचे खुळून दिले तुझिया हातात
फुल मनाचे खुळून दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
फुल मनाचे खुळून दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ तुटल्या फुलाला, देठ तुटल्या फुलाला
देठ तुटल्या फुलाला भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
जा, जा, जा दिले-दिले मन तुला
कर त्याचे तू काहीही-काहीही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
♪
तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
ए, तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
एवढेच म्हणू, "आता तुझ्या नशिबात होते"
ए, तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
एवढेच म्हणू, "आता तुझ्या नशिबात होते"
पडे त्याच्या हाती दिवा, पडे त्याच्या हाती दिवा
पडे त्याच्या हाती दिवा ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
जा, जा, जा दिले-दिले मन तुला
कर त्याचे तू काहीही-काहीही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
♪
मनाविन जगताना...
मनाविन जगताना वाटे मलाही बरेच
मनाविन जगताना वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही वाटे आश्चर्यस खेद
मनाविन जगताना वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही वाटे आश्चर्यस खेद
मला एक मन भारी, मला एक मन भारी
मला एक मन भारी, तुला दोन्ही जड नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
जा, जा, जा दिले-दिले मन तुला
कर त्याचे तू काहीही-काहीही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
Поcмотреть все песни артиста