एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई ♪ अगदीच हळूवार नको राजरोष पाकळीच एक नको डवरली घोस अगदीच हळूवार नको राजरोष पाकळीच एक नको डवरली घोस पानासाठी कवितेच्या देना खुण काही एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई ♪ क्षण एक थांब अशी हवीशी होऊन एकदाच मनी तुला घेतो चितारून क्षण एक थांब अशी हवीशी होऊन एकदाच मनी तुला घेतो चितारून आणि तुझ्या मौनाचीच चित्रावर सही एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई