आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो... त्रस्त या जिन्यास झाला स्पर्श ओझरता तिचा अन नाको म्हटले तरी मी जगाया लागलो. |2| गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...|3| ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...|4| शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...|5| मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...|6| काय हे आयुष्य माझे, काय हे थट्टा तरी मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो... |7| मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...|8|