Kishore Kumar Hits

Vasant Desai - Dev Jari Maj - Mol Karin şarkı sözleri

Sanatçı: Vasant Desai

albüm: Nisarga Sangeet


देव जरी मज कधी भेटला
देव जरी मज कधी भेटला
"माग हवे ते, माग", म्हणाला
"माग हवे ते, माग", म्हणाला
म्हणेन प्रभू रे, माझे सारे
म्हणेन प्रभू रे, माझे सारे
जीवन देई मम बाळाला
देव जरी मज, देव जरी मज
देव जरी मज कधी भेटला

कृष्णा, गोदा स्नान घालु दे
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी
मुक्ताई निजवु दे तुजला
देव जरी मज, देव जरी मज
देव जरी मज कधी भेटला

शिवरायाच्या मागीन शौर्या
कर्णाच्या घेईन औदाऱ्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा
लाभु दे चिमण्या राजाला
लाभु दे चिमण्या राजाला
देव जरी मज कधी भेटला
"माग हवे ते, माग", म्हणाला
म्हणेन प्रभू रे, माझे सारे
जीवन देई मम बाळाला
देव जरी मज, देव जरी मज
देव जरी मज कधी भेटला

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar