Kishore Kumar Hits

Nandesh Umap - Ikkad Raja Tikkad Raja şarkı sözleri

Sanatçı: Nandesh Umap

albüm: Damlelya Babachi Kahani


म्हणा...
अ... अ.आ.आ
अ... आ... ई... ई.उ.ऊ... ए... आए... ओ... ओ... अं... अः...
इक्कड राजा इक्कड बाजा
सगळा नुसता गाजावाजा
अ.अ.अननस... आ.आ.आई
वरतुन खाली... खालून खाली...
घसरत घसरत आत्या आली...
याचे पोट त्याचे पोट
क ला काना... का.
ख ला काना... खा
क.क.कमळातला... कमळातला.कमळातला
आला आला आला आला
साहेब झाला साहेब झाला
हाजी हाजी झुकवा मला
सलाम ठोका थुंकी झेला
मास्टर करून राहीले गणती
सगळी नुसती खोगीरभरती
त्यांच्या नावे होते पाटी
राही त्यांच्या अडड्या वरती
केंद्रोकेंद्री बढती धाडी
सगळी गाढवे बनली घोडी
साक्षरतेची धो धो करता
निरक्षरांची तरते होडी
बबन नमन कर
छगन भजन कर
सजली सोंगे सजली ढोंगे
पाटयांवरती पाढे कोष्ट
सुजाण सारे अजान होऊन
सुजानतेचे करती नाटक
जुनी टाकुनी अवघी ओळख
नवीन नावे नवीन गावे
खोटी नावे खरे तोतये
खोट्यासाठी खरे लिहावे
अशी साधना अशी तपस्या
सरस्वती ही गदगदली
अभियानाची खरूज अवघ्या
" नि खाजवली
बे एके बे... बे दूणे चार...
बे त्रिक सहा.बे चोक... बे चोक... बे चोक...
नको कारणे ना गारहाणे
मतलब केवळ आदेशाची
आदेशाचे गुलाम असले
घुमे पिपाणी विजयाची
साक्षरते वर उठे निशाणी
एका डाव्या अंगठ्याची

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar