हे-हे रूपाची खाण कशी दिसतीया अप्सरा ही मनामंदी रूप तिचं बांधलं हे नजरनं सांगू कसं मनातलं भाव माझं? धडधडतंय काळीज हे आज गं धडधड काळीज हे आज गं, राणी धडधड काळीज हे आज गं लागलं पिरतीचं याड, खुळावलं माझं मन रंगला तुझ्यात जीव आज गं रूप तुझं चंद्रावानी बसलं माझ्या ध्यानी-मनी पाहताच हरपलं भान गं लागलं पिरतीचं याड, खुळावलं माझं मन रंगला तुझ्यात जीव आज गं रूप तुझं चंद्रावानी बसलं माझ्या ध्यानी-मनी पाहताच हरपलं भान गं ♪ साजिरं रूप तुझं दडलं मनात गं आईना बी लाजतो तुझ्यापुढं सुखामंदी नांदू दे तुझ्या-माझ्या जोडीला साकडं मी घालतो देवाकडं तुझ्यासाठी प्रीतीचं गाणं गातुया रूप तुझं पाहुनी शिवार झुलतंया तुझ्यासंग जिंदगीचं सोनं झालंया सुखाचं आभाळ दाटून आलंया संसाराच्या गाडीला लाभली साथ तुझी जगण्याच्या वाटला तुझीच सोबत ही तुझ्यासंग जग हे माझं न्यारं झालंया लागलं पिरतीचं याड, खुळावलं माझं मन रंगला तुझ्यात जीव आज गं रूप तुझं चंद्रावानी बसलं माझ्या ध्यानी-मनी पाहताच हरपलं भान गं लागलं पिरतीचं याड, खुळावलं माझं मन रंगला तुझ्यात जीव आज गं रूप तुझं चंद्रावानी बसलं माझ्या ध्यानी-मनी पाहताच हरपलं भान गं प ध प म ग रे सा रे रे रे रे प प ध प म ग सा रे ♪ राया, माझा सूर्यावानी लखलखता दिवा मातीसाठी लढणारा शूरवीर मावळा राया, माझा सूर्यावानी लखलखता दिवा मातीसाठी लढणारा शूरवीर मावळा भोळा ह्यो जीव माझा तुम्हावर लागला तुमच्याच मिठीमंदी जीव हा थांबला काळजात कोरलंया मी तुमचंच नाव धनी, साता जन्माची हवी साथ तुम्हासंग जगण्याचं, राया सुख मला लाभलंया देवानं बांधली ही गाठ रुबाबदार माझा रांगडा गडी लागलं पिरतीचं याड, खुळावलं माझं मन रंगला तुझ्यात जीव आज रं रूप तुझं बसलं माझ्या मनामंदी-धनामंदी पाहताच हरपलं भान रं लागलं पिरतीचं याड, खुळावलं माझं मन रंगला तुझ्यात जीव आज रं रूप तुझं बसलं माझ्या मनामंदी-धनामंदी पाहताच हरपलं भान रं