जरा-जरा गडबडलं, जरा-जरा गोंधळलं काही, काही, काही कळं ना जीव तुझ्यावर जडलं, इपरित काही घडलं काही, काही, काही सुच ना रुणझुणलं तुझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी गं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला गं छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय ♪ चांदरात सजली, सांज ही दरवळली तुझ्या संगतीनं रंग बरसले हे नव्याने वारं स्पर्श देई का रं? साद तुझी येता का मी हरवले? तुझ्या नजरेनं रं भूल मला देईल चाहूल अशी लागतेय रुणझुणलं माझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी रं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला रे छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय ♪ चकवा असा बसला, मुखडा तुझा दिसला वाटलं असं जग हे थांबलं नाव तुझं जपलं, श्वासात भरलं सारलं असं, मन बावरलं तुझ्या इश्काची या आस मला लागलाया ध्यास आज गं रुणझुणलं तुझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी गं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला गं छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय