तू गं अलवार साजणी तू गं अलवार साजणी ♪ अगं मनात भरलीस तू, गावलाय आज रंग जिथं-तिथं दिसतेस तू, येगळाचं हा छंद हसतंय, लाजतंय, येडपिसं यड मला लावतंय रूप तुझं उमलु दे कळी ही गालावर खळी ओढ लागली तू काळजाची तार अशी छेडली तू गं अलवार साजणी तू काळजात कधी, कशी भिनली तू गं अलवार साजणी तू काळजाची तार अशी छेडली तू गं अलवार साजणी ♪ मी तुझ्यावर जीव हरले, ना मला कळे गंध हा कोणता रे? भास कि खरे? बरसून तू अशी गं ये, घन आज दाटलंय विसरून तू स्वःतला ये, मन साद घालतंय उमलु दे कळी ही गालावर खळी ओढ लागली तू काळजाची तार अशी छेडली तू गं अलवार साजणी तू काळजात कधी, कशी भिनली तू गं अलवार साजणी तू काळजाची तार अशी छेडली तू गं अलवार साजणी ♪ मी तुझ्यामध्ये गुंतले रे, भान ना उरे हे दिसाचं चांदणं रे, का मला दिसे? ठाव तुझा तू मला गं दे, अवतन धाडलंय अस मला तू सपानं दे, धुमशान मातलंय उमलु दे कळी ही गालावर खळी ओढ लागली तू काळजाची तार अशी छेडली तू गं अलवार साजणी तू काळजात कधी, कशी भिनली तू गं अलवार साजणी तू काळजाची तार अशी छेडली तू गं अलवार साजणी