जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी
अन् तिथे नांदतो 'सदानंद' हर उंच डोंगरी गडावरी
यळकोट-यळकोट 'जय मल्हार'
जेजुरीच्या खंडेराया जागराला या-या
(जेजुरीच्या खंडेराया जागराला या-या)
वाईच्या तू गणराया जागराला या-या
(वाईच्या तू गणराया जागराला या-या)
पसरणीच्या भैरी देवा जागराला या-या
(पसरणीच्या भैरी देवा जागराला या-या)
जेजुरगडा वाजे चौघडा, वाजे चौघडा
पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं
(पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं)
रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली
(रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली)
बानूबाईचं येड लागलं, मल्हारी देव मल्हारी
(बानूबाईचं येड लागलं, मल्हारी देव मल्हारी)
इसरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी
(इसरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी)
येळकोट-येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
(येळकोट-येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती)
नवलाख पायरी गडाला हो चिरा जोडिला खडकाला
(नवलाख पायरी गडाला हो चिरा जोडिला खडकाला)
बोला हो तुम्ही बोला-बोला हो तुम्ही बोला
म्हाळसा नारीला, म्हाळसा नारीला
(बोला हो तुम्ही बोला-बोला हो तुम्ही बोला
म्हाळसा नारीला, म्हाळसा नारीला)
भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला
(भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला)
मल्हारी-मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी
(मल्हारी-मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी)
गळा घालितो, भंडारी देव मल्हारी
(गळा घालितो, भंडारी देव मल्हारी)
मल्हारी मार्तंड जयमल्हार, मल्हारी मार्तंड जयमल्हार
(मल्हारी मार्तंड जयमल्हार, मल्हारी मार्तंड जयमल्हार)
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri