Kishore Kumar Hits

Padmaja Phenani Joglekar - Bal Gajanan şarkı sözleri

Sanatçı: Padmaja Phenani Joglekar

albüm: Megha Re


बाल गजानन गौरीनंदन
जिंकी चुरशीला
शडानन मानी सत्याला
जमले देव हि साक्षीला
सदाशिव पाहि बाललिला
गजानन जिंकी चुरशिला...
लपंडाव खेळता उभय हे -२
करीती कलहाला
लपंडाव खेळता उभय हे
करीती कलहाला
समजावूनी सांगती मुनि नारद -२
नामी उपायाला
सिद्ध ते बंधु चुरशिला
जमले देव हि साक्षीला
सदाशिव पाहि बाललिला
गजानन जिंकी चुरशिला...
जिंकनार जो परिक्रमा करी -२
आधी पृथ्वीला
लगबगीने प्रस्थान करी तो अवनी फेरीला
शडानन मयुरावरी बैसला
जमले देव हि साक्षीला.
लंबोदर तुंडिलतनु घेऊनी
मुषक साथीला
बुद्धिसागर प्रदक्षिणा करी -२
आई पार्वतीला
मानूनी अवनी जननीला
देवगण करीती कौतुकाला
शडानन मानी सत्याला
गजानन जिंकी चुरशीला.

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar