Kishore Kumar Hits

Padmaja Phenani Joglekar - Unch Unch Maza Zoka şarkı sözleri

Sanatçı: Padmaja Phenani Joglekar

albüm: Sadabahar Geet


आपण झोक्यावर बसतो, आणि झोका घेता-घेता
हाच झोका, आकाशालाच बांधल्याचं आपण स्वप्न बघतो
आणी या स्वप्नाच्या धुंधीत आपलं मन वाऱ्यासारखे हलकं-फुलकं होऊन जातं
हे स्वर्गीय सुख, हे स्वर्गीय सुख आता आपण आपल्याला पाहिजे तेव्हा मिळवू शकतो
आता आपण सर्वजण Padmaja बरोबर गाऊया ना
"उंच-उंच माझा झोका
उंच-उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता, उतरता झाला पदर वारा-वारा"

उंच-उंच माझा झोका
उंच-उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
उंच-उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता, उतरता
झोका चढता, उतरता झाला पदर वारा-वारा
उंच-उंच माझा झोका

झोक्याला देते वेग-वेग-वेग
झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला
झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला
लाल मातीच्या, लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला
उंच-उंच माझा झोका

झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला
झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला
दंवा-धुक्याचा शुभ्र साज
दंवा-धुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढविला
उंच-उंच माझा झोका

झोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल
झोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल
मोकळ्या केसांमधे गुंफी सनया लाल-लाल
गुंफी सनया लाल-लाल
उंच-उंच माझा झोका

झोका चढतो उंच-उंच, पाय पोचती मेघांवरती
झोका चढतो उंच-उंच, पाय पोचती मेघांवरती
इंद्राच्या डोहावरी लाल पाखरे पाण्या येती
लाल पाखरे पाण्या येती
उंच-उंच माझा झोका

झोका चढतो उंच-उंच, उंच-उंच, उंच-उंच
झोका चढतो उंच-उंच, मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर
गुंजेएवढे माझे घर, त्याची ओळख आवडेना
उंच-उंच माझा झोका
उंच-उंच माझा झोका
उंच-उंच माझा झोका

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar