प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी? प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी? कळेल का ते तुला कधी? कळेल का ते तुला कधी? काय उमलते मनामधी प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी? प्रीती जडली तुझ्यावरी... ♪ नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते धडधडते काळीज उरी, वीज नसामधुनी घुसते ओठावर जे थरथरते... ओठावर जे थरथरते ओळखशील का सांग कधी? प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी? प्रीती जडली तुझ्यावरी... ♪ पैलतिरावर मूर्ति तुझी, वाट बघे मी ऐलतिरी पैलतिरावर मूर्ति तुझी, वाट बघे मी ऐलतिरी घुमतो पावा एक इथे सूर भरी लहरी-लहरी कसे पोचवू गीत तुला? कसे पोचवू गीत तुला? अफाट वाहे मधे नदी प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी? प्रीती जडली तुझ्यावरी... ♪ ताण सोसवे मुळी न हा, व्याकूळ झाला जीव अता ताण सोसवे मुळी न हा, व्याकूळ झाला जीव अता फुलल्यावाचून सुकायची अशीच का ही प्रेमकथा साद घातली मी तुजला... साद घातली मी तुजला देशिल ना पडसाद कधी? प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी? कळेल का ते तुला कधी? कळेल का ते तुला कधी? काय उमलते मनामधी प्रीती जडली तुझ्यावरी, तुझ्यावरी, तुझ्यावरी