Kishore Kumar Hits

Devi Sri Prasad - Srivalli Marathi Version şarkı sözleri

Sanatçı: Devi Sri Prasad

albüm: Pushpa - The Rise


मी सहज पाहिले तुला सख्या मला पाहतांना
अन मी पाहील्यावर हळूच नजर चोरून जातांना
व्हावा तू माझा रे, अन मी व्हावी तुझी
कळणार रे तुला सांग ना रे कधी?
वेडी-पिशी मी हल्ली, श्रीवल्ली
का रे तुला ना कळली?
वेडी-पिशी मी हल्ली, श्रीवल्ली
का रे तुला ना कळली?

ओ, मोठ्या तोऱ्याचा माझा हा डौल
छुनछुन वाजते पैंजण पाऊल
लपवा-छपविचा करतो का रे खेळ?
तुझी मी, माझा तू होऊ दे ना मेळ
(वेड-पिसळते, मी अडखळते)
(जागेपणी तुझे स्वप्न का पडते?)
(पाहुनी तुजला मी मोहरते)
(पडते खळी गाली)
वेडी-पिशी मी हल्ली, श्रीवल्ली
का रे तुला ना कळली?
वेडी-पिशी मी हल्ली, श्रीवल्ली
का रे तुला ना कळली?

हा, लाखो दिवाने माझ्या मागे-पुढे
तरी मन हे माझे तुझ्यात रे अडे
मौनाची भाषा श्वासात अवखडे
समजून घे ना रे प्रेमाला थोडे
(वाहुनी तुजला माझे ही पण)
(देहभान हे अर्पिले यौवन)
(कृष्ण सख्या, तुझी राधा गौळण)
(तुजला शरण आली)
वेडी-पिशी मी हल्ली, श्रीवल्ली
का रे तुला ना कळली?
वेडी-पिशी मी हल्ली, श्रीवल्ली
का रे तुला ना कळली?

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar