Kishore Kumar Hits

Ajay Gogavale - Maai Bappa Vithala şarkı sözleri

Sanatçı: Ajay Gogavale

albüm: Maai Bappa Vithala


तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
घरातच कारावास सोसला रं रातंदीस
तुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस
गोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत
चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत
तुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
युगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड
काय झाला अपराध झाला लेकरांसी दंड
कर सावट हे दूर जनामना दे उभारी
यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी
कसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
बघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ
तुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ
साहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग
वाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग
थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन
सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन
आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो
बघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो
तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ
सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त
दवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास
कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास
लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून
की हे काळाचे सावट जावे निघून लांबून
पिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा
कलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा
पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन
साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन
सारे निवारून मग पंढरीस मी जाईन
बाळा चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar