Kishore Kumar Hits

Milind Ingle - Kadhi Sanjveli şarkı sözleri

Sanatçı: Milind Ingle

albüm: Saanj Gaarva


आता तुला सगळं जून आठवेल की नाही, कुणास ठाऊक?
आता तुला सगळं जून आठवेल की नाही, कुणास ठाऊक?
सारे प्रहर, आपलं शहर, गर्दीचा कहर
त्या गर्दीत तू मला नी मी तुला शोधायचो
शोधता-शोधता आपणच मग हरवायचो
एकमेकांची आठवण काढत खुप एकटे फिरायचो
जसे एकाच ट्रेनमध्ये वेगळ्या डब्यात शिरायचो
अधून-मधून दूर जायची आपली सवय तिथली
तुझं गाव कुठलं आणि तुझी पायवाट कुठली
एकमेकांची उगाच अशी चेष्टा करत राहायचो
गोंधळलेले चेहरे आपले हसत-हसत पाहायचो
ती चेष्टा खरी होईल कधीच वाटलं नव्हतं
गर्दीत तेव्हा डोळ्यात कधी पाणी दाटलं नव्हतं
आता वय निघून चाललंय हलक्या-हलक्या पावलांनी
त्यात मला वेढलंय पुन्हा तुझ्या जुन्या सावल्यांनी
एक-एक सावलीत उन्हासारखं सारं लक्ख आठवतंय
एकट्यामधून उठून मला गर्दीत कुणी पाठवतंय
मी उठून येईनही, मागे वळून पाहिनही
मला शोधत राहिनही, गर्दीत हरवून जाईनही
तुला मात्र कोणी तुझं पाठवेल की नाही, कुणास ठाऊक?
तुला मात्र कोणी तुझं पाठवेल की नाही, कुणास ठाऊक?
आलीस तरी तुला सगळं आठवेल की नाही, कुणास ठाऊक?
आता तुला सगळं जून आठवेल की नाही, कुणास ठाऊक?
आता तुला सगळं जून आठवेल की नाही, कुणास ठाऊक?
कधी सांजवेळी मला आठवुनी
कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी
पाहशील का? पाहशील का? पाहशील का?

तुझा दूर येथे उठू दे शहारा
हो, तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा
शरीरावरुनी जसा गार वारा
वाहशील का? वाहशील का? वाहशील का?

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का? राहशील का? राहशील का?

तुझ्या आठवांना इथे साहतो मी
ओ, तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही
तुला साहतो मी तशी तू मलाही
साहशील का? साहशील का? साहशील का?
कधी सांजवेळी मला आठवुनी
कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी
पाहशील का? पाहशील का? पाहशील का?

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar