संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं माणसांमध्ये असूनसुद्धा मी अगदी एकटा असतो अळवावरचा थेंब जसा त्यावर बसून वेगळा असतो मला व्याकूळलेला पाहून सूर्य क्षणभर रेगांळतो इंद्रधनू होतो आणि सात रंगांत ओघळतो आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा वाऱ्यावरती लहरत येतो तुझ्या आठवणींचा थवा एकाएकी दरवळ उठतो रातराणी येते फुलून तू आता येतेस याची मला पटते खूण पैंजणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास चोहीकडे भरुन राहतात घमघमणारे तुझे भास खरंच, संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा अश्या धुंद वेळी तुझा हात माझ्या हाती हवा हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा उतरून येई आभाळ खाली किरणे जराशी सोन्यात न्हाली उतरून येई आभाळ खाली किरणे जराशी सोन्यात न्हाली तुझे भास होती चारी दिशांना माझ्या जीवा झाली जराशी दिवे लागणी झाली जराशी दिवे लागणी मौनात कोणी गाईल गाणी झाली जराशी दिवे लागणी मौनात कोणी गाईल गाणी उमलून आता मेघात ये चांदण्यांचा दिवा हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा अश्या धुंद वेळी तुझा हात माझ्या हाती हवा हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा हवा