निळ्या मनाचे निळे किनारे
निळ्या जळाची निळसर खळखळ
निळ्या मनाचे निळे किनारे
निळ्या जळाची निळसर खळखळ
एकांताच्या निळ्या मिठीतुन
निळ्या रात्रीचा निळाच दरवळ
निळ्या मनाचे निळे किनारे
निळ्या जळाची निळसर खळखळ
♪
वेणूच्या बेटातून शिरला
मन भिरभिरला वारा निळसर
निळ्या हातीची निळसर मुरली
आणि तिच्यातुन निळसर फुंकर
वेणूच्या बेटातून शिरला
मन भिरभिरला वारा निळसर
निळ्या हातीची निळसर मुरली
आणि तिच्यातुन निळसर फुंकर
निळ्या स्वरांनी भुलवून गेले
काही निळसर चंचल अवखळ
निळ्या मनाचे निळे किनारे
निळ्या जळाची निळसर खळखळ
♪
कसे निळ्याचे निळसर गारुड
भूल कशी ही निळसर पडली
काया तर झालीच निळी, पण
छाया देखील निळीच झाली
कसे निळ्याचे निळसर गारुड
भूल कशी ही निळसर पडली
काया तर झालीच निळी, पण
छाया देखील निळीच झाली
निळ्या पथानी निळी पाऊले
निळ्या चाहूली, निळीच सळसळ
निळ्या मनाचे निळे किनारे
निळ्या जळाची निळसर खळखळ
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri