म ग पा म ग पा प म ग म प नी सा नी प म ग ग हृदयामधले गाणे माझे कधीच नव्हते असे अनावर हृदयामधले गाणे माझे कधीच नव्हते असे अनावर इतुकी नाजूक रिमझिम नव्हती या आधी या स्वरा-स्वरांवर हृदयामधले गाणे माझे कधीच नव्हते असे अनावर ♪ करून सारी बंद कवाडे मी माझ्यातच रमले होते करून सारी बंद कवाडे मी माझ्यातच रमले होते वाटत होते कळले अवघे परंतु काही कळले नव्हते मना आतले आतुर काही आज अचानक ये ओठांवर हृदयामधले गाणे माझे कधीच नव्हते असे अनावर ♪ न कळे केव्हा, कसे उमटले? चंद्रखुणांचे ठसे साजीरे न कळे केव्हा, कसे उमटले? चंद्रखुणांचे ठसे साजीरे आता, आता हसण्यावरती रंग पसरती जरा लाजरे पडे अनामिक भूल मनावर जसे चांदणे ये देहावर हृदयामधले गाणे माझे कधीच नव्हते असे अनावर इतुकी नाजूक रिमझिम नव्हती या आधी या स्वरा-स्वरांवर हृदयामधले गाणे माझे कधीच नव्हते असे अनावर