अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
खरं सांगते, खरं सांगते...
खरं सांगते, खरं सांगते तूच रे आता माझा भरवसा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
♪
अंगणी माझ्या नदीच झाली
नाव कागदी डोलू लागली
अंगणी माझ्या नदीच झाली
नाव कागदी डोलू लागली
आनंदाच्या लहरी नयनी भाव अनामिक जसा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
♪
खोचून परकर लगेच लवकर
धूम पळाले अंगणी भरभर
खोचून परकर लगेच लवकर
धूम पळाले अंगणी भरभर
थंडगार त्या गारा पाहून हर्ष गवसला कसा
पावसा, तू हवासा, तू दिलासा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
♪
धार धराया छपरावरची
धरून गजांना बसली खिडकी
धार धराया छपरावरची
धरून गजांना बसली खिडकी
स्वर्ग सुखाला यथेच्छ लुटले भरून वाहतो कसा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
♪
घेऊन गिरकी थेट निघाले
वेचाया मी टपोर चाफा
घेऊन गिरकी थेट निघाले
वेचाया मी टपोर चाफा
गोळा केले पाऊस मोती परडीतून या जसा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
अरे, पावसा, तू हवासा, तू दिलासा
Поcмотреть все песни артиста