ओल्या-ओल्या देहावर रेषा ओढल्या जशा रातीवर चांदण्या विखुरल्या थेंब-थेंब अन पायाशी ओघळला जसा सडा पारीजातकाचा सांडला तोल-तोल माझा सावरता येई ना खोल-खोल किती मन हाती राही ना तुझ्या स्पर्शाची ही सर थांबे ना ओल्या-ओल्या देहावर रेषा ओढल्या जशा रातीवर चांदण्या विखुरल्या थेंब-थेंब अन पायाशी ओघळला जसा सडा पारीजातकाचा सांडला ♪ अंग-अंग हे रंगून जाई असा रंग पाण्याचा कुठून कुठे मन वाहून नेई नाद दूर नेण्याचा तुझ्या नजरेचा पावसाळा सरेना अन घट माझ्या मानाचाही भरेना तुझ्या स्पर्शाची ही सर थांबे ना ओल्या-ओल्या देहावर रेषा ओढल्या जशा रातीवर चांदण्या विखुरल्या थेंब-थेंब अन पायाशी ओघळला जसा सडा पारीजातकाचा सांडला ♪ चिंब-चिंब हे गाव तुझे रे वेड मला भिजण्याचे विरघळते हे नाव जसे बघ वेद मला रुजण्याचे आता माझं मला काही मन उरेना हरवली वाट पावसात मिळे ना तुझ्या स्पर्शाची ही सर थांबे ना ओल्या-ओल्या देहावर रेषा ओढल्या जशा रातीवर चांदण्या विखुरल्या थेंब-थेंब अन पायाशी ओघळला जसा सडा पारीजातकाचा सांडला