राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे हो, राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे सावळी-सावळी, साद ही सावळी शाम नाही कुठे शोधते रे? राधा ओ, दिवाणी रे, ओली कहाणी रे राधा दिवाणी रे... ♪ कालिंदीच्या तिरावरती निळसर बोली ऐकावी मोरपिसाच्या स्पर्शामधली रेशीम चाहूल शोधावी इशारा त्याचा साधा, बावरी होते राधा इशारा त्याचा साधा, बावरी होते राधा वाहती-वाहती सूर हे भारले शामरंगी धुके साहते रे राधा हो, दिवाणी रे, ओली कहाणी रे राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे ♪ रुसली राधा जेव्हा कान्हा आला नाही भेटाया गोकुळ सारे रंगून गेले शाम सुखाची ही माया भेटला यमुनेकाठी, सावळ्या रेशीमगाठी भेटला यमुनेकाठी, सावळ्या रेशीमगाठी चांदणे-चांदणे बरसते अंगणी रंगले मोहना अंग माझे राधा हो, दिवाणी रे, ओली कहाणी रे राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे सावळी-सावळी, साद ही सावळी शाम नाही कुठे शोधते रे? राधा दिवाणी रे, ओली कहाणी रे राधा दिवाणी रे...