ओळखीची साद मला घाली तो गं रावा
...साद घाली तो गं रावा
♪
ओळखीची साद मला घाली तो गं रावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
ओळखीची साद मला घाली तो गं रावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
♪
डोंगराच्या पलीकडं हिरवळ दाट
तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट
डोंगराच्या पलीकडं हिरवळ दाट
तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट
छाया निंबोणीची देई सुखद गारवा
छाया निंबोणीची देई सुखद गारवा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
♪
लिंबलोन उतरील मायेची माऊली
बापाजींची माया कल्पवृक्षाची सावली
लिंबलोन उतरील मायेची माऊली
बापाजींची माया कल्पवृक्षाची सावली
तिच्या छायेत जीवा मिळेल विसावा
तिच्या छायेत जीवा मिळेल विसावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
♪
थवा राघुंचा गं जाई उडुनिया दूर
थवा राघुंचा गं जाई उडुनिया दूर
पाणावले डोळे, मनी उठते का हुर?
पाणावले डोळे, मनी उठते का हुर?
डोंगरापल्याड दूर...
डोंगरापल्याड दूर बुडतो चांदवा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
ओळखीची साद मला घाली तो गं रावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
मन उडुनिया जाई माहेराच्या गावा
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri