भिवरेच्या काठी एक झळाळता पुंज थेट भिवरेच्या काठी एक झळाळता पुंज थेट पाप-पुण्य संचाळीत उभी आहे एक वीट उभी आहे एक वीट भिवरेच्या काठी एक ♪ युगे २८ जरी कालचक्र भिरभिरी विठू नाम घेता उरी विट असे पंढरपुरी युगे २८ जरी कालचक्र भिरभिरी विठू नाम घेता उरी विट असे पंढरपुरी हीरे, मोती मानिकांचे मोल नाही आजवरी विठुबाला सांभाळीत पाऊल ते डोईवरी भिवरेच्या काठी एक... ♪ सप्तपाताळांच्या आत स्वर्गधरीच्या अतीत नाही पोहचत ही जाण परब्रम्हरुपी खाण सप्तपाताळांच्या आत स्वर्गधरीच्या अतीत नाही पोहचत ही जाण परब्रम्हरुपी खाण नाद उठे ओंकाराचा साद भोवताली व्याकुळले मन तरी विठ्ठलाच्या पायी भिवरेच्या काठी एक... ♪ विट अशी सामोरी अन टेकविला माथा अंतरात उसंबळ काळ्या-निळ्या लाटा विट अशी सामोरी अन टेकविला माथा अंतरात उसंबळ काळ्या-निळ्या लाटा करी विठू हरी-हरी "विठ्ठल" हे नाम ओठावर दुजे नाही, नाही दुजे धाम भिवरेच्या काठी एक झळाळता पुंज थेट भिवरेच्या काठी एक झळाळता पुंज थेट पाप-पुण्य संचाळीत उभी आहे एक वीट उभी आहे एक वीट भिवरेच्या काठी एक