तुझ्याविना हा श्रावण वैरी कोसळती धारा जिवलगा परतून ये माघारा परतून ये माघारा मुक्या जीवाला छळून जातो मुक्या जीवाला छळून जातो भिरभिरता वारा जिवलगा परतून ये माघारा परतून ये माघारा झाड मुक्याने बहरून येतात फूल गळावे फांदीवरले सुन्या-सुन्या या कातर वेळी मन माझे रे गहिवरलेले सुकून गेला वेळी मधला सुकून गेला वेळी मधला घम-घमता गजरा परतून ये माघारा, परतून ये माघारा मुक्या जीवाला छळून जातो मुक्या जीवाला छळून जातो भिरभिरता वारा जिवलगा परतून ये माघारा, परतून ये माघारा थेंब थांबले डोळ्या मधले डोळे थांबून वाट पाहती वाटेवरती दिवे पेटले जळून गेल्या कापूर वाती तू खरे काळीज कुणास दावू? तू खरे काळीज कुणास दावू? जीवा नसे थारा परतून ये माघारा, परतून ये माघारा मुक्या जीवाला छळून जातो मुक्या जीवाला छळून जातो भिरभिरता वारा जिवलगा परतून ये माघारा, परतून ये माघारा जिवलगा