Kishore Kumar Hits

Bela Shende - Sanj Manatil Nayani Zukali şarkı sözleri

Sanatçı: Bela Shende

albüm: Marathi Romantic Songs


सांज मनातील नयनी झुकली
युगे-युगे मी वाट पाहिली
सांज मनातील नयनी झुकली
युगे-युगे मी वाट पाहिली
अजुनी चाहूल नसे तुझी का?
छळते याद मना
मना, हे, तुझवीन सांगू कुणा
आठवणींची रंग पालखी
डोळ्यातून रे होई बोलकी
आठवणींची रंग पालखी
डोळ्यातून रे होई बोलकी
अजुनी चाहूल नसे तुझी का?
छळते याद मना
मना, हे, तुझवीन सांगू कुणा

पश्चिम क्षितिजी मेंदी ओली
स्वप्ने नयनी उतरून ओली
सनईचे ते सुर अबोली
तना-मनातून मिलन वेळी
अधीर जीवाची ओढ कळेना
शब्द असुनही साद जुळेना
छळते याद मना
मना, हे, तुझवीन सांगू कुणा

दोघांवाचून कुणा कळावी
तुझी नी माझी परीकथा ही
राहे अधुरी मुखी व्यथा ही
डोळे मिटत हळुच मिटावी
तुझीयावाचून काही सुचेना
गुन्हा कोणता अजुन कळेना
छळते याद मना
मना, हे, तुझवीन सांगू कुणा
आठवणींची रंग पालखी
डोळ्यातून रे होई बोलकी
अजुनी चाहूल नसे तुझी का?
छळते याद मना
मना, हे, तुझवीन सांगू कुणा
छळते याद मना
मना, हे, तुझवीन सांगू कुणा

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar