नभ कसं दूर-दूर निळं, काळ घणभर दिसतंय गं मन माझ थेंब-थेंब होऊन सारं भिजतंय गं नभ कसं दूर-दूर निळं, काळ घणभर दिसतंय गं मन माझ थेंब-थेंब होऊन सारं भिजतंय गं या नभाची मेघवेडी आस जागते बाजूच्या मी गर्द रानी चिंब-चिंब न्हाहते नभ कसं दूर-दूर निळं, काळ घणभर दिसतंय गं ♪ पदर हिरवागार सोडुनिया चौपार नदी वाहते, चिंब न्हाहते कटी ती मोहक खास, नभाचा चुकला श्वास वेड लावते, वेड लावते त्या नदीचे चिंब गाणे कोणी ओठी गायले? पावसाचे हे तराने कोणी येथे छेडले? नभ कसं दूर-दूर निळं, काळ घणभर दिसतंय गं ♪ या गंधल्या आसमंती साजली उनी सतरंगी हो, रुणझुणती पाऊले गं ओलावली अंतरंगी नाद रानात घुमून राही आल्या फुलून दिशा या दाही लाजरी गं, साजरी गं श्रावणाची प्रीत वेडी रवी कोवळा-कोवळा होई झाल्या तरुण जाई नी जुई मेघ वेडा या जगाला सांगे पावसाची खोडी नभ कसं दूर-दूर निळं, काळ घणभर दिसतंय गं मन माझ थेंब-थेंब होऊन सारं भिजतंय गं या नभाची मी गं वेळी आस जागते बाजूच्या मी गर्द रानी चिंब-चिंब न्हाहते नभ कसं दूर-दूर निळं, काळ घणभर दिसतंय गं मन माझ थेंब-थेंब होऊन सारं भिजतंय गं